काम धंदागोष्ट पैश्याचीलेटेस्ट

Tata Cars Offers | टाटांच्या कार्स स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी ! जाणून घ्या ऑफर

Tata Cars Offers :- टाटा मोटर्सने (Tata Motors)जून महिन्यात त्यांच्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे. नवीन आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सच्या विक्रीच्या दृष्टीने सरलेला महिना खूप चांगला ठरला आहे.

आता या महिन्यात सूट जाहीर झाल्याने या महिन्यातही विक्री चांगली होण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची माहिती जाणून घ्या.

(Tata Nexon)

ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही (SUV) आहे. या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरच्या पेट्रोल व्हेरियंटवर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाते आहे. तर डिझेल श्रेणीतील व्हेरियंटवर 5,000 रुपयांची सूट दिली जाते आहे.

(Tata Tiago)
टाटांची सर्वात किफायतशीर कार असलेल्या टिअॅगोवर (Tiago) 10,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त XZ ट्रिम आणि त्यावरील व्हेरियंटवर दिली जात आहे.

याशिवाय, हॅचबॅकच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. मात्र त्याच्या i-CNG प्रकारावर कोणतीही ऑफर दिली जात नाही.

(Tata Tigor)
टाटा टिगोर (Tata Tigor) बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या XZ आणि वरील मॉडेल्सवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे.

यासोबतच या छोट्या सेडानच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातो आहे. कंपनी या वाहनावर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देते आहे.

(Tata Harrier)
या जूनमध्ये टाटा हॅरियरवर रोख सवलत नाही. पण कंपनी त्यावर 40,000 रुपयांचा प्रचंड एक्सचेंज बोनस देते आहे. यासोबतच 5000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.

जर आपण लोकप्रिय सफारीवरील ऑफरबद्दल बोललो, तर कंपनी यावर 40,000 रुपयांचा मोठा एक्सचेंज बोनस देते आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button