ताज्या बातम्या

Tata Punch EV : टाटा पंच ईव्ही लॉन्चसाठी तयार ! यादिवशी बाजारात घालणार धुमाखुळ; जाणून घ्या किंमत, फीचर्स

भारतीय बाजारात टाटा पंच ईव्ही लॉन्चसाठी तयार आहे. टाटा पंच EV दोन बॅटरी आकार आणि चार्जिंग पर्यायांसह ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.

Tata Punch EV : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी लक्षात घेऊन टाटा आता मोठा धमाका करणारा आहे. कारण टाटाची पंच या कारला ग्राहकांनी दिलेल्या पसंतीनंतर आता कंपनी याचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा पंच EV ही कार दोन बॅटरी आकार आणि चार्जिंग पर्यायांसह ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की लहान बॅटरी पॅक एका चार्जवर सुमारे 250 किमीची श्रेणी देऊ शकतो, तर मोठा बॅटरी पॅक 350 किमी पर्यंतची श्रेणी देऊ शकतो.

टाटा पंच सर्वात आवडती कार

Advertisement

Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत, ज्यात हॅचबॅक सेगमेंटमध्ये Tiago EV, सेडान सेगमेंटमध्ये Tigor EV आणि सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Nexon EV यांचा समावेश आहे. आता टाटा मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये अतिशय लोकप्रिय पंचचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

टाटा पंच EV कधी येणार?

टाटा पंच EV ची चाचणी खूप दिवसांपासून सुरू आहे आणि आता बातमी येत आहे की त्याची किंमत पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामात समोर येऊ शकते. मात्र, याबाबत टाटा मोटर्सकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे अजून किती दिवस वाट पाहावी लागेल हे सांगता येणार नाही.

Advertisement

टाटा पंच EV किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होईल

लोक टाटा पंच EV ची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत आणि असा विश्वास आहे की कंपनी 10 लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करू शकते. पंच इलेक्ट्रिक लॉन्च होण्याआधीच त्याच्या लूक आणि फीचर्सची माहिती समोर येत आहे.

Nexon EV सारखे स्टीयरिंग व्हील Tata Panch Ev मध्ये दिसेल.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, नुकत्याच लाँच झालेल्या Tata Nexon EV सारखे स्टीयरिंग व्हील पंच EV मध्ये देखील दिसेल. याव्यतिरिक्त, यात पंचच्या आइस व्हेरियंटपेक्षा मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील असेल. त्यासोबत पंच EV मध्ये 10.25 इंच स्क्रीन दिसण्याची शक्यता आहे.

टाटा पंच लुक आणि डिझाइन

लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, टाटाच्या आगामी इलेक्ट्रिक SUV पंच EV मध्ये EV बॅजिंग, नवीन अलॉय व्हील्स आणि सर्व चाकांवर डिस्क ब्रेक्स आहेत. याशिवाय वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जर, सुरक्षितता वैशिष्ट्ये यामध्ये पाहायला मिळतील.

Advertisement

दरम्यान, Tata Punch EV कंपनीच्या Ziptron तंत्रज्ञानासह सादर केले जाईल आणि त्यामध्ये असेलली बॅटरी पॅकची श्रेणी प्रति चार्ज 300-350 किलोमीटरपर्यंत असू शकते. असे मानले जाते की टाटा पंच EV दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते. व लॉन्च झाल्यानंतर ही कार Citroen EC3 ला टक्कर देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button