Tata VS MG : Nexon की MG ZS, तुमच्यासाठी सर्वात चांगली इलेक्ट्रिक कार कोणती? आधी जाणून घ्या आणि मग खरेदी करा
देशात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्याची संख्या दररोज वाढत आहे. अशा वेळी तुम्ही Tata Nexon EV VS MG ZS EV खरेदी करू शकता.

Tata VS MG : जर तुम्हाला प्रवासाला परवडणारी कार म्हणजेच इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला Tata Nexon EV आणि MG ZS EV या दोन्ही कारबद्दल सांगणार आहे.
सध्या देशात सर्वात जास्त लोक टाटा Nexon EV चे चाहते आहेत. कंपनीने नुकतेच या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले आहे. ही कार एका चार्जवर 465 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. त्याच वेळी दुसरीकडे तुम्हला MG ZS EV मध्ये देखील अनेक शक्तिशाली फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत.
2023 Tata Nexon EV
या कारचा टॉप स्पीड 120 Kmph आहे. ही कार 378 लीटरच्या मोठ्या बूट स्पेससह येते. यात पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. ही मस्त कार रस्त्यावर 129 एचपीची टॉप पॉवर देईल. व एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 465 किमी पर्यंत धावते. कारला 245 Nm टॉर्क मिळतो, जो तिला हाय स्पीड देण्यास मदत करतो.
9 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग
2023 Tata Nexon EV फक्त 9 सेकंदात 100 kmph चा वेग गाठते. या नवीन कारमध्ये 40.5 kWh चा बॅटरी पॅक आहे. ही कार 56 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या कारमध्ये टच-आधारित क्लायमेट कंट्रोल आणि 10.25-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टम आहे. ही कार 14.74 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर केली जात आहे.
MG ZS EV एक्सक्लुझिव्ह प्रो
सुरक्षिततेसाठी या कारला सहा एअरबॅग्ज आणि EBD सह ABS सिस्टीम देण्यात आली आहे. ABS अचानक ब्रेकिंग करताना कारच्या चाकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
तसेच या फ्युचरिस्टिक कारमध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि स्पीड असिस्ट सिस्टीम यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच MG ZS EV Exclusive pro एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 461 किमी पर्यंत धावते.
पॅनोरामिक सनरूफ आणि 10.1-इंच टचस्क्रीन सिस्टम
ही डॅशिंग कार 8.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. ही कार 27.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. या लक्झरी कारमध्ये 50.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे.
तसेच या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये आहेत. कारला 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 10.1-इंचाची टचस्क्रीन मिळते. अशा प्रकारे तुमच्यासाठी ही एक उत्तम कार ठरेल.