अहमदनगर

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर तहसीलदारांनी पकडले

गेल्या महिनाभरापूर्वी तहसिलदार प्रशांत पाटील यांच्यासह महसुल पथकाने गोदावरी पात्रात छापा टाकला होता. मात्र वाळूतस्करांच्या पंटरला माहिती मिळाल्यानंतर गाड्या पळून गेल्याने महसुल विभागाची ही कारवाई अपयशी ठरली होती, मात्र पुन्हा एकदा तहसिलदार प्रशांत पाटील यांनी वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तहसिलदार पाटील यांनी सराला-गोवर्धन परिसरातून येणारा एक डंपर शिरसगाव हद्दीत तर दुसरा मातुलठाण येथून भरून आलेला एक डंपर पकडला.

त्यामध्ये एकात अंदाजे 3 ते 3॥ ब्रास तर दुसरीत दीड ते दोन ब्रास असा वाळूसाठा पकडल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. तस्करांनी चलाखी करत दुसरा डंपर हा गोंधवणी-दिघी नजीक एका वीटभट्टीमध्ये लपवला होता.

महसुल पथकाच्या एक तासाच्या अथक परिश्रमानंतर हा डंपर सापडला. हि कारवाई तहसिलदार प्रशांत पाटील यांचेसह श्रीरामपूरचे तलाठी राजेश घोरपडे, प्रविण सुर्यवंशी, ज्ञानेश्वर हाडोळे, संतोश लचोरे, कुणाल काळे, कोतवाल गणेश बिरदवडे, चालक तुळशीराम शिंदे आदींच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button