अहमदनगर

वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार थेट रस्त्यावर…वाळू वाहतूक करणारी 5 वाहने पकडली

श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांविरूद्ध तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कारवाई केली आहे.

तहसीलदार पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी छापेमारी करत अवैध वाळू वाहतूक करणारी 5 वाहने पकडली आहे. या कारवाईने वाळू तस्कर धास्तावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रशासनाच्या या पथकाने अचानक गोवर्धनपूर परिसरात छापेमारी करत एक वाहन पकडले. तस्करांनी इतर वाहने अंधारात लपवली.

मात्र ग्रामस्थांनी गावातील नागरिकांच्या मदतीने अंधारात लपवून ठेवलेली चार वाहने ताब्यात घेण्यात आली. सदर वाहने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

दरम्यान गोवर्धन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्कर वेगवेगळया ठिकाणांहून बेकायदा वाळू वाहतूक करत आहेत. या वाहतुकीवरून अनेकदा ग्रामस्थ आणि वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री झाली आहे.

एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या शर्यतीत अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी धडक कारवाई करत 5 अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली.

ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. याचा मोठा धसका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button