अहमदनगरताज्या बातम्या

भयानक अपघात… ट्रॅक्टरचे मधोमध तुकडे होऊन 1 ठार 3 जखमी

संगमनेर तालुक्‍यातील डोळासणे शिवारातील बांबलेवाडीजवळ पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने असलेल्या पिकअपने एका ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काल गुरुवारी (दि. १३) सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे मधोमध दोन तुकडे होवून ट्रॅक्टरखाली दाबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे शाळेत जाणार्‍या एका विद्यार्थ्यांसह दोन विद्यार्थिनी देखील जखमी झाल्या आहे.

त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकती चिंताजनक आहे. अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून पसार झाला. यावेळी बांबलेवाडीचे ग्रामस्थ व महामार्ग पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करीत जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुळचा जुन्नर तालुक्‍यातील उंब्रज येथील रहिबासी असलेला संतोष नारायण शिंदे हा तरुण सकाळी आठ वाजेच्या सुमारास आपला ट्रॅक्टर घेवून घारगावकडून संगमनेरकडे येत होता.

त्याचे वाहन डोळासणे शिवारातील बांबलेवाडरीनजिक आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील महिंद्र पिक अप वाहनाने पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍्टरचे मधोमध दोन भाग होवून त्याचा मोठा टायर ट्रॅक्‍्टरपासून तुटून वेगळा झाला. आणि उर्वरीत इंजिनसह राहीलेल्या अर्ध्यांभागात दबल्याने ट्रॅक्‍टर चालक संतोष शिंदे हा जागीच ठार झाला.

हा अपघात घडला. त्यावेळी बांबलेबाडीतील अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे व राणी लहु लोहकरे हे तीन विद्यार्थी रस्त्याने पायी शाळेत चालले होते. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे काही अवशेष उडून इतरत्र पडल्याने त्यात हे तिघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघाताच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाब घेतली. याबाबत गावकऱ्यांनी महामार्ग पोलिसांसह घारगाव पोलिसांनाही कळविले.

अपघाताची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांतच डोळासणे महामार्ग पोलीस घटनास्थळी हजर झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य करीत जखमी झालेल्या तिघा विद्यार्थ्यांना तत्काळ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यातील अनुराग गोडे या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.

तर ट्रॅक्‍्टरचालक अपघातग्रस्त वाहनाखाली दाबला गेल्याने क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टरचे अवशेष उचलून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघातानंतर सुमारे तासभर नाशिककडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. डोळासणे महामार्ग पोलिसांनी एकीकडे मदतकार्य आणि दुसरीकडे वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button