अहमदनगर

‘त्या’ व्हायरल क्लिपची पोलिसांनी घेतली दखल; एसपींनी मागविला अहवाल

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना आलेल्या धमकीच्या क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागविण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता.

हल्लेखोरांनी 5 फायर केले होते. त्यातील दोन गोळ्या राजळेंच्या शरिरात घुसल्या होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच रविवारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

क्लिपमध्ये मंत्री गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना जीवे मारण्याविषयी उल्लेख आहे. यासाठी 21 इस्त्रायली बनावटीच्या गन (पिस्तुल) आणल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘माझी भीती वाटत असल्याने ते उदयन यांना माझ्या परिसरात फिरू देत नाहीत.

माझ्यासाठी जीवाला जीव देणारी सोनईतीलच पोरं आहेत. आदेश देताच ते थेट मंत्री गडाखांना घरात घुसून मारतील. मला मरायची भीती नाही. नादी लागला,

तर मंत्री गडाखांना वाजवू आणि मुलगा उदयन यांनाही ठोकू’, अशा संभाषणाची तथा धमकीची क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. दरम्यान, मंत्री शंकरराव गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांच्या जीवाला धोका असल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर आले आहे.

ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या क्लिपमधील आवाज एका फरार आरोपीचा असून, तो सोनईचाच रहिवाशी असल्याचा दावा गडाख समर्थकांनी करत आहेत.

पोलीस अधीक्षक पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी या क्लिप संदर्भात संबंधित पोलिस ठाण्याकडून अहवाल मागविला असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button