Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरबारामतीत वातावरण तापले ! अजित पवार म्हणाले, लोकसभेला मिठाचा खडा लागल्यास मी...

बारामतीत वातावरण तापले ! अजित पवार म्हणाले, लोकसभेला मिठाचा खडा लागल्यास मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही..

Ahmednagar News : येणाऱ्या लोकसभा, विधानसभेमुळे चांगलेच वातवरण तापले आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना या मोठ्या पक्षांत फूट पडल्यानंतर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा या पहिल्याच निवडणुका आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामती मतदार संघावर अनेकांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदार संघात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान त्यांनी बारामतीत आगामी निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीत मी माझा उमेदवार देईल, त्यावेळी विधानसभेला अजितला मत देऊ आणि लोकसभेला तिकडे मत देऊ असे विचहर तुमच्या मनात येतील पण असे करू नका,

मला मत द्यायचे असेल तर लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच द्या, जर खासदारकीचा उमेदवार पडला तर आमदारकीच्या बाबतीत मी वेगळा विचार करेन, मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

त्यामुळे आता बारामतीत देखील राजकीय वातावरण तापले आहे. तेथेही पवार विरोधात पवार असा संघर्ष पाहायला मिळेल असे दिसते. व्यापारी महासंघातर्फे बारामतीत मेळावा आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार

अजित पवार यावेळी म्हणाले, मागील अनेक वर्षात प्रचंड मेहनत मी घेतली आहे. असे करूनही जर माझ्या शब्दाला साथ मिळाली नाही तर मी तरी हे सगळे कशासाठी करु असा प्रतिप्रश्न करत ते पुढे म्हणाले की,

मी हाच वेळ माझ्या व्यवसायासाठी दिला तर मी हेलिकॉप्टरमधून फिरेल. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मी व्यवसाय पाहिला तर मी जे काम करतो ते कोणीच मायेचा लाल करु शकणार नाही असा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणेल किंवा भावनिक देखील करू शकतील पण ते काम नाही करणार.

बारामतीकरांना ठरवायचे आहे, कामाच्या पाठीशी उभे राहायचे की भावनिक लोकांच्या मागे उभे राहायचे आहे असे अजित पवार म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments