अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील बहुचर्चित दूध भेसळ प्रकरणातील चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

श्रीगोंदा तालुक्यातील दूध भेसळप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांच्या समोर सुनावणी झाली.
या सुनावणीत न्यायाधीश शुक्ला यांनी पोलिसांच्या तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत चौघांचा जामीन फेटाळला आहे. या दूध भेसळ प्रकरणातील आरोपींच्या जामीनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या श्रीगोंदा येथील दूध भेसळ प्रकरणात आरोपींनी व्हेपरमिट पावडर आणि लाईट लिव्वीड पैराफिनच्या सहायाने विनापरवाना कृत्रीम दूध तयार त्याची विक्री करत असल्याचे अन्न व सुरक्षा अधिकऱ्यांना आढळून येताच त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत २४ जणांवर गुन्हा दाखल करत सुमारे १० आरोपींना अटक केली. अटक आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी भेसळ युक्त दूध तयार करण्यासाठी व्हे परमिट पावडर आणि लाईट लिव्वीड पैराफिन विनापरवाना खरेदी करून त्यापासून भेसळयुक्त दुध तयार करून विक्री केल्याचे तपासात दिसून आले.
या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला. तर तपास पोलीस उप निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या १० आरोपींपैकी दिपक विठ्ठल मखरे, निलेश विठ्ठल मखेरे रा. दूध भेसळ प्रकरणात फरार असलेल्या १४ आरोपींपैकी सतीशउर्फ आबा कन्हेरकर रा. भानगाव, शुभम बोडखे, दीपक बापू वागसकर रा. सुरोडी, अतुल वसंत बारगुजे, रा.घोटवी, ता. श्रीगोंदा, महेश मखरे रा.मखरेवाडी, ता. श्रीगोंदा, समीर शेख, रा. राहुरी, हेमंत टेके,
रा.अकलूज, सविता वैभव हांडे, रा.उमरज, या आठ आरोपींनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, या प्रकरणी सुनावणी चालू असून, यावर अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नाही. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा, वैभव रामदास राऊत, संदिप बबन राऊत रा. बोरुडेवाडी, ता. श्रीगोंदा यांनी जमीन अर्ज दाखल केले होते.
या जामीन अर्जावर जिल्हा व अति सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांच्यासमोर सुनावणी झाली. तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपींच्या जामीन अर्जावर हरकत घेत आरोपींचा दूध भेसळ करण्यामध्ये कसा सहभाग आहे तसेच भेसळयुक्त दुध मानवी शरिरास अपायकारक आहे.
तसेच या गुन्हाचे व्याप्ती मोठी आहे. त्यामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याने सखोल चौकशी करणे आहे, असा युक्तिवाद अतिरिक्ती सरकारी वकिल विष्णुदास भार्डे यांनी केला. जिल्हा व अति सत्र न्यायाधिशांनी सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन चारही आरांपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे