अहमदनगर

50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- कोठला स्टॅण्ड परिसरातील फलटण चौकी येथे 50 वर्षीय अनोळखी पुरूष बेशुध्द अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मृत्यू झाला आहे.

 

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत पुरूषाची ओळख पटविण्याचे आव्हान तोफखाना पोलिसांसमोर आहे.

 

अनोळखी पुरूषाचे वर्णन- वय 50, बांधा सडपातळ, उंची 171 सेमी., रंग गोरा, चेहरा सरळ, डोक्यास अर्ध टक्कल व काळे पांढरे केस, अंगात फुल भायाचा चौकडी निळा पिवळा शर्ट व राखाडी व मळकट पॅन्ट, मिशी दाढी काळ्या पांढर्‍या रंगाची वाढलेली आहे.

 

वरील वर्णनाच्या व्यक्तीविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस अंमलदार ए.बी.तरटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button