अहमदनगर

अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- एक 45 वर्षीय अनोळखी पुरूष नवनागापूर येथील दांगट मळा भागात बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यास जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान त्याचे मृत्यूचे कारण समजू शकले नाही. यामुळे परिसरात खळखळ उडाली.

 

दांगट मळा भागात रविवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता एक अनोळखी पुरूष बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यास खासगी रूग्णवाहिकेचे चालक तुपे यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

 

वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत यांनी तपासणी केली. अनोळखी पुरूष हा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सचिन गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button