अहमदनगर
शेतातील पडक्या खोलीत आढळून आला अनोळखी महिलेचा मृतदेह…

कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घारी गावच्या शिवारात शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत दौलत दामू होन यांच्या मालकीचे शेतामधील पडक्या खोलीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान सदर महिलेचे वय 25 असून तिचा गळा आवळल्याच्या खुणा पोलिस तपासात दिसून आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.