लेटेस्ट

गृहिणींचे बजेट कोलमडणार… घरगुती गॅसच्या दरात झाली मोठी वाढ

पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत सिलेंडरची किंमत ९४९. ५० रुपये झाली आहे.

मागी वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळं आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यानंतर आज घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे.

दरम्यान दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ९४९. ५० रुपये इतकी आहे. मुंबईसह देशातील अन्या शहरातही महागाईने उच्चांक गाठला आहे. कोलकातामध्ये ९७६ रुपये, तर चेन्नईत ९६५.५० रुपये इतका दर झाला आहे.

लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी ९८७.५० रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने १००० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर १०३९.५० रुपये झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button