अहमदनगर

उमेदवारी नाकारल्याने मुंडे यांच्या कार्यकर्त्याने घेतला विषाचा प्याला…!

भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने निराश झालेले मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरातील एका कार्यालयात मुकुंद गर्जे हे माजीमंत्री पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीकडून वेळोवेळी कसं टाळून त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे,

असे भाष्य करून सोशल मीडियावर ते प्रसारित करीत होते. याप्रसंगी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माजीमंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते,

कालच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गर्जे यांना तत्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र. पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वत:च्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. या नैराश्यातून मुकुंद गर्जे यांनी स्वत: आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

मात्र, गर्जे यांच्या मित्रांनी त्यांना रोखल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला. परळीच्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करण्याचे कटकट कारस्थान रचले हे राजरोसपणे भाजप विरोधी पक्षातील कार्यकर्ते व नेते सांगत आहेत. तो पराभव आपल्याच लोकांमुळे झाला आहे.असा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button