Home अहमदनगर वकील दाम्पत्य खून प्रकरणात वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात

वकील दाम्पत्य खून प्रकरणात वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात

0
47
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News :  राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या वकिल दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली.

या घटनेतील आरोपींनी वापरलेली गाडी राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेतली आहे. राहुरी येथील अॅड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्याचे (दि. २५) जानेवारी रोजी अपहरण करुन त्यांचा निघृण खून करण्यात आला.

या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनिल मोरे (रा. उंबरे) या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले.

या घटनेतील ३ आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालयासमोर कबूली जबाब देऊन गुन्हा कबूल केला. यातील किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खूनाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट,

जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. वकिल दाम्पत्याचे अपहरण केल्यानंतर त्यांचा निघृण खून करून आरोपी हे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते.

(दि. २६) जानेवारी रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान आरोपी हे त्यांच्या सुझुकी फ्रोन्झ या चारचाकी वाहनातून पसार झाले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here