गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

गुटखा व शस्त्र प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली आहे.
दरम्यान शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात 50 हजाराची दुचाकी व दहा हजारांचा देशी बनावटीचा कट्टा पाचशे रुपये किमतीचे जीवत काडतुस, 72 हजारांचा गुटखा पानमसाला 38 हजारांची तंबाखू असा जवळपास दोन लाख 39 हजार पाचशे 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
शिर्डी पोलिसांनी हि कारवाई करत दोघांना अटक केली होती तर यामधील एकजण फरार आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयुष सुनिल केशेसीया (वय 19 रा. इंदौर, मध्यप्रदेश), आशिष अशोकलाल खाबिया (वय 28, रा. शिर्डी) अशी या दोघांची नावे आहे.
तर अभय गुप्ता (रा. इंदौर मध्यप्रदेश) हा फरार आहे. यातील दोघांना राहता न्यायालयात हजर केले असता राहता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली.
जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर शिर्डी परीसरात खळबळ उडाली आहे. यापुढील काळात देखील अवैध व्यवसाय रोखण्याची शिर्डी पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून यात फरार असलेल्या अभय गुप्ता यांचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे.