अहमदनगर

जिल्ह्यातील 273 कर्जदाराचे 11 कोटीहुन अधिकचे थकीत कर्ज उपमुख्यमंत्र्यांनी केले माफ

राज्याचे अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यभरातील भूविकास बँकांची कर्जमाफी जाहीर केली. यात नगर जिल्ह्याच्या थकबाकीदारांनाही लाभ मिळाला आहे.

यामध्ये थकबाकीत असलेल्या जिल्ह्यातील बड्या 273 कर्जदारांनी भूविकास बँकेकडून घेतलेले 11 कोटी 76 लाख 72 हजारांचे थकीत कर्ज पवारांनी माफ केले.

दरम्यान 1998 मध्ये या कर्जदारांनी कर्ज घेतले होते. कोणी ट्रॅक्टरसाठी घेतले तर कोणी अन्य कृषी साहित्य वा शेतीपिकासाठी. कर्ज घेतल्यावर परतफेड केली गेली नाही.

मात्र, अशा जिल्ह्यातील 292 थकबाकीदारांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्जमाफीच्या रुपाने कृपा करण्याचे ठरवले होते व तसे मागच्या ऑगस्ट 2021 मध्ये जाहीरही केले होते.

राज्यभरातील भूविकास बँकेच्या सर्वच थकबाकीदारांना कर्जमाफी देण्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केल्याने त्यांच्या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा होती.

या घोषणेतून जिल्ह्यातील बडी राजकीय व सामाजिक धेंडे असलेल्या 292 जणांनाही 11 कोटी 11 लाखाची माफी मिळणे अपेक्षित होते.

मात्र, त्यानंतर काहींनी त्यांच्याकडील थकीत पैसे भरल्याने आता थकबाकीत 273 जण राहिले आहेत. जिल्ह्यात 273 थकीत कर्जदारांकडे थकबाकीपैकी 2 कोटी 93 लाख 35 हजार रुपयांची मुद्दल रक्कम येणे असून, त्यावर व इतर व्याज असे एकूण रक्कम 11 कोटी 76 लाख 72 हजार रुपये होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button