अहमदनगर

ड्रायव्हर गाडी पार्क करण्यासाठी गेला आणि चार लाख घेऊन गेला

ड्रायव्हरने गाडी पार्क करण्याचा बहाणा करून गाडीतील चार लाख रूपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना अहमदनगर शहरातील कापड बाजारात घडली.

या प्रकरणी अनिल राजाराम वर्पे (वय 62 रा. भवानी शंकर रोड, दादर, मुंबई) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अफजल बीन (रा. कोळीवाडा सिवडी, मुंबई, मुळ रा. सिंगाव, राज्य आसाम) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वर्पे त्यांच्या चारचाकी गाडीने ड्रायव्हरसह शहरातील कापड बाजार परिसरात आले होते. कापड बाजारात गाडी लावण्यासाठी जागा नसल्याने ड्रायव्हर अफजल बीन याने गाडी दुसरीकडे लावतो, असे सांगून गाडी घेऊन तेथून निघून गेला.

त्यानंतर गाडी माळीवाडा परिसरात सोडून गाडीतील चार लाख रूपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक गायकवाड अधिक तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button