अहमदनगर

पाच लाखांसाठी सासरच्यांनी विवाहितेला मारले; जिल्ह्यातील लाजिरवाणी घटना

संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दुकानासाठी माहेरुन 5 लाख रुपये आणावेत या कारणासाठी 26 वर्षीय विवाहीतेचा सासरच्या मंडळींनी छळ करुन जीवे मारल्याची घटना घडली आहे.

सौ. रविना सुनिल सांगळे (वय 26, रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व भाया या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मयत विवाहीतेचे वडील शांताराम बबन वणवे (रा. जांभूळवाडी मळा हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, रविना हिचे सुनिल बबन सांगळे याचेबरोबर विवाह झाला होता. विवाहाच्या एक वर्षानंतर रविनाला शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला.

सुनिल सांगळे याचे घुलेवाडी येथे टायरचे दुकान आहे. सदर टायरचे दुकान हे मोठे करण्यासाठी तिने माहेरुन 5 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा वारंवार छळ सुरु होता.

पती सुनिल बबन सांगळे, सासरा बबन दत्तात्रय सांगळे, सासू मंदाबाई बबन सांगळे, भाया तान्हाजी बबन सांगळे, नणंद अर्चना सुधीर जायभाये (सर्व रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) यांनी तिला वारंवार मारहाण करुन जिवे ठार मारले असे फिर्यादीत म्हंटले आहे..

Related Articles

Leave a Reply

Back to top button