ताज्या बातम्याशेवगाव
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा पराक्रम ! मक्याच्या शेतातील गांजा…

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडगव्हाण (ता. शेवगाव) येथील शेतात छापा टाकून गांजाची 335 लहान मोठी झाडे (किंमत 2 लाख 50 हजार 500 रुपये) जप्त केली आहेत. यासंदर्भात एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस संतोष शंकर लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी अशोक सुदाम काजळे (वाडगव्हाण शेवगाव) याला ताब्यात घेतले आहे. अशोक काजळे याच्या शेतात बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलिसांच्या मदतीने काजळे याच्या शेतात जाऊन पाहणी केली. मक्याच्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आली होती. अखेर 335 लहान मोठी हिरवी झाडे जप्त करण्यात आली.