गाडी रिपेअरिंगसाठी घेऊन आलेल्या फिटरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मोबीन अहमद शेख रा. राजवाडा, कब्रस्थान रोड, राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादीचे चारचाकी वाहन खराब झाले होते. ते वाहन फिर्यादीने नितीन शहाणे यांच्या दुकानासमोर लावले होते. गाडी रिपेअर करण्यासाठी फिटर घेऊन येऊ, असे नितीन शहाणे यांनी सांगितले.
शहाणे हे त्या अल्पवयीन मुलीला घेऊन त्यांच्या मोटारसायकलवर राहुरी खुर्द येथील बॅटरीच्या दुकानात गेले. तेथून ते फिटर घेऊन राहुरीकडे येत होते.
हाणे हे मोटरसायकल चालवित होते. त्यांच्या पाठीमागे ती 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बसली. तिच्या पाठीमागे आरोपी बसला होता. त्यावेळी आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत पीडितेने कुटुंबियांना सांगितले.
पीडितेच्या आईने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबीन अहमद शेख रा. राजवाडा, कब्रस्थान रोड, राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.