Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगअहमदनगरच्या 'या' माजी आमदाराचा तरुणांसमोर आदर्श ! मॅरेथॉनमध्ये ६९ मिनिटांत पार केले...

अहमदनगरच्या ‘या’ माजी आमदाराचा तरुणांसमोर आदर्श ! मॅरेथॉनमध्ये ६९ मिनिटांत पार केले १० किलोमीटर अंतर

अहमदनगरचे राजकारण व राजकारणी हे राज्याच्या दृष्टीने नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान हे राजकारणी केवळ राजकारणातच नव्हे तर व्यायामामधेही भारी असल्याचे समोर आले आहे. मॅक्सिमस नगर राईझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी अवघ्या ६९ मिनिटांत १० किलोमिटरचे अंतर पार करत तरुणांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. नगर येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

नगर येथील नगर रायझिंग फाउंडेशन, मॅक्सिमस स्पोर्ट्स अकॅडमी व शांतीकुमार फिरोदीया मेमोरियल फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने३ फेब्रुवारी रोजी सकाळी अहमदनगर क्लब येथे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘हम फिट तो नगर फिट’ स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत डॉ. नरेंद्र फिरोदिया, डॉ. शाम तारडे, डॉ. सतीश सोनवणे आदींसह विविध वयोगटातील तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी सलग ५ व्या वर्षी १० किलोमीटरचे अंतर अवघ्या ६९ मिनिटांत पार करून युवा पिढीसमोर व्यायामाबद्दलचा एक आदर्श ठरला आहे.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याहस्ते गौरव पदक घुले यांना प्रदान करण्यात आले. घुले पाटील हे एक राजकीय व्यक्ती असले तरी रोजच्या धावपळीत वेळात वेळ काढून सकाळी उठून व्यायाम करत असतात.

माजी आ.घुले म्हणतात…

आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. अशा धावपळीच्या आयुष्यात निरोगी जीवन जगता आले तर सर्व काही साध्य होते. व्यायाम व धावणे हे निरोगी जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण झाले आहे. वय वाढत जाते तसा जो निरोगी बनत जातो तोच खरा युवक. तरुणांनी व्यायामालाच आपले व्यसन बनवले पाहिजे. आरोग्य हीच खरी संपत्ती असा मंत्र त्यांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments