अहमदनगर

खूनी हल्ला करणारे ‘ते’ चौघे अखेर जरेबंद

भिंगारमधील एका कुटुंबियावर खूनी हल्ला करणारे करण संजय नकवाल (वय 22), अतुल राजेंद्र नकवाल (वय 28), सुमित राजेंद्र नकवाल (वय 30), अमन अजय खरारे (वय 20 सर्व रा. महात्मा कॉलनी, भिंगार) यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

त्यांच्यासह इतरांविरूध्द भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल असून काही आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. 10 नाव्हेंबर, 2021 रोजी रात्री अमित जगदीश कुडीया (रा. वाल्मीक सोसायटी, भिंगार) यांना आरोपी अजय नकवाल व विकी नकवाल हे विनाकारण शिवीगाळ करत होते. त्यावेळी फिर्यादी आशा राजु नकवाल (वय 55 रा. वाल्मीक सोसायटी) या आरोपींना म्हणाल्या,‘ शिवीगाळ का करता’,

याचा राग आल्याने आरोपींनी गैरकायद्यांची मंडळी जमवून लाकडी दांडके, दगडे, लोखंडी पाईप, तलवारीने फिर्यादी आशा यांच्यासह अमित कुडीया, सुमित कुडीया, जगदीश कुडीया यांना मारहाण करत खूनाचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक झाली असून त्यांना जामीन देखील मिळाला आहे. यातील पसार असलेले आरोपींना अटक करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button