Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरधुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद !

धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद !

Ahmednagar News : तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले जवळ असलेल्या टाळूची वाडी येथे मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा

बिबट्या शिकारीच्या नादात अखेर काल सोमवारी (दि.२२) मध्यरात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील अनेक गावामध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे. पठार भागातील टाळूची वाडी परिसरातही अनेक दिवसांपासून बिबट्याची भटकंती सुरू होती.

या बिबट्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्या फस्त केल्या होत्या. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तीन दिवसांपूर्वी टाळूचीवाडी मधील शेतकरी आदेश घुले याच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता.

या पिंजऱ्यात असलेल्या शिकारीच्या नादात अखेर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला. हा बिबट्या नर जातीचा आहे.

टाळूची वाडी, सावरगाव घुले या भागात अनेक बिबटे असून या ठिकाणी आणखी पिंजरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी चैतन्य कासार, देशमुख, वन कर्मचारी एकनाथ घुले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments