Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअल्युमिनियम तारेची चोरी करणारी टोळी गजाआड ! ५ आरोपींना अटक

अल्युमिनियम तारेची चोरी करणारी टोळी गजाआड ! ५ आरोपींना अटक

Ahmednagar News : लोणी पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेल्या कैलास वाघ यांची जोरदार कारवाई करीत अल्युमिनियम तारेची चोरी करणाऱ्या ५ आरोपींना गजाआड केले आहे.

त्यांचेकडून ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना पाथरे-नारायणगांव दरम्यान सुरू असलेल्या उच्चदाब वाहिनीचे काम सुरू असताना घडली आहे.

इरफान हनिफ शेख, वय ३५ रा. संगमनेर, सलीम अय्युब शहा, वय २५ रा. श्रीरामपूर, वसीम जब्बार शेख, वय २५ रा. श्रीरामपूर, बाबासाहेब नामदेव हासे,

वय ३० रा. संगमनेर, संकेत राधाकृष्ण पावसे रा. संगमनेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेण्यात आले.

याबाबत सुरेश नंदलाल प्रसाद ( सिनिअर सुपरवायझर ) लोणी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लि. नारायणगाव, पुणे सदरची कंपनी व महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीचे पॉवर सप्लायर टॉवर्स उभारणीचे काम सुरू आहे.

महाराष्ट्र वीज मंडळाकडून कंपनीस ४०० के. व्ही. बाभळेश्वर ते कुडूस जिल्हा ठाणे या दरम्यान अति उच्चदाब पॉवरचे काम दिले होते.

याच कंपनीकडून राहाता तालुक्यातील पाथरे येथे काम सुरू आहे. पुढील काम सुरू असल्याने सदर अल्युमिनियम तारेमध्ये विद्युत पुरवठा सुरू केलेला नव्हता.

या वस्तूंच्या सुरक्षेसाठी अर्जुन खर्डे व रवींद्र खर्डे यांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक होती. सदर कामाची पाहणीसाठी दि.३१ तारखेस पाथरे ते नारायणगांव दरम्यान टॉवरचे कंडक्टर व तार चोरीस गेल्याचे आढळले. सदर अल्युमिनियम तारेचे वजन दोन टन असू शकते.

याबाबत तपास केला असता पिंपरी चिंचवड परिसरातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे कडून सुमारे ८० हजारांची तार व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा ५ लाख ८० हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपींवर ४१/२०२४ कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीचे सपोनि कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश शिंदे, पीएसआय आशिष चौधरी, एएसआय सुखदेव खेमनर, बाबासाहेब इंगळे, पो. हवालदार निलेश धादवड, रवींद्र मेढे, रवींद्र माळी यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments