Ahmednagar Crime : चारा आणण्यासाठी गेलेली मुलगी परत आलीच नाही ! चिठ्ठी सापडली आणि आई वडील म्हणाले…

जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात दिनांक २७ मे २०२३ रोजी घडली आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील १७ वर्षे ९ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील एका गावात राहते.
ती १२वी इयत्तेत शिक्षण घेत होती. दि. २७ मे २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या मुलीने आई- वडिलांना सांगीतले, की मी जनावरांना शेतातून घास घेऊन येते. असे सांगुन ती घास कापण्यासाठी विळा व घास बांधण्यासाठी फडके घेवुन निघुन गेली.
त्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला असताना तिने घास कापण्यासाठी नेलेला विळा व फडके एका शेतात लिंबाच्या झाडा खाली मिळुन आले.
त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. सदरची चिठ्ठी वाचुन पाहीली असता त्यामध्ये मी आत्महत्या करणार आहे. मला १२ वीच्या परिक्षेत कमी मार्क मिळाल्याने मी जीव देणार आहे, असे चिठ्ठीत लिहीलेले आहे.
त्यानंतर आई- वडिलांना खात्री झाली की, त्यांच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात कारणा करीता पळवून नेली असावी. घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.