अहमदनगर

पर्यटकांना खुणावणारे जिल्ह्यातील ‘हे’ धरण अखेर भरले

अहमदनगर – दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले आणि पर्यटकांना खुणावणारे मांडओहोळ धरणात शुक्रवारी 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मांडओहोळ धरण शुक्रवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले आहे.

 

मांडओहळ धरणामुळे पारनेर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच हे धरण भरल्यामुळे नगर आणि पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. धरण भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटक गर्दी करणार आहेत.

 

मांडओहोळ धरण भरल्याने शेतकरी वर्गासह पारनेरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सव काळात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. धरण भरल्याने संपूर्ण पारनेर तालुक्याची तहान भागणार असल्याचे उपविभागीय अभियंता शिंदे व मांडओहोळ मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता मोरे यांनी सांगितले.

 

 

मांडओहळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफुट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफुट आहे. यावर्षी पळसपूर, नांदुर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण भरले आहे.

 

 

या अगोदर 2019, 2020 व 2021 रोजी देखील मांडओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मांडओहळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफुट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफुट आहे. यावर्षी पळसपूर, नांदुर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण भरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button