अहमदनगर

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तलाठ्याला हॉटेल चालकाने बेदम चोपला

 संगमनेर शहरालगतच्या एका गावामध्ये कार्यरत असलेल्या कामगार तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालकासोबत अरेरावी केल्याची घटना घडली.

त्यांनतर सदर हॉटेल चालकाने या तलाठ्याला बेदम चोप दिला आहे. हो घटना नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारातील एका हॉटेलमध्ये घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या एका सहकार्‍याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून हा कामगार तलाठी आपल्या काही सहकार्‍यांसह नाशिक-पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. या हॉटेलमध्ये तलाठ्याने भरपूर मद्यप्राशन केले. जेवण झाल्यानंतर त्याने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद अवस्थेत त्याने हॉटेल चालकाशी अरेरावी केली. यामुळे संतापलेल्या या हॉटेल चालकाने या कामगार तलाठ्याला बेदम चोप दिला.त्याला मारहाण झाल्याची माहिती समजतात त्याच्या संघटनेच्या काही सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले.

रात्री पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेत हॉटेल चालकालाही मोठी दुखापत झाली असून तो शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या हॉटेल चालकाने तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल करू नये यासाठी प्रयत्न सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button