अहमदनगर

दरोडा टाकून खून करणारा सराईत अखेर गजाआड

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे दरोडा टाकून खून झाला होता. या गुन्ह्यात पसार असणार्‍या सराईत गुन्हेगार अश्पाक वैभव काळे (रा. पांगरमल ता. नगर ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे पकडले.

 

गोपीनाथ लक्ष्मण भावले (रा. करंजी ता. पाथर्डी) हे घरामध्ये झोपलेले होते. यावेळी चोरट्यांनी घरात घुसून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. गळ्यातील 20 हजारांची सोन्याची पोत व मंगळसूत्र बळजबरीने काढून घेतले. गोपीनाथ लक्ष्मण भावले यांच्या डोक्यात हत्याराने मारहाण व जखमी केले, यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शांताबाई गोपीनाथ भावले यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु एक आरोपी घटना घडले पासून पसार होता.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, अर्जुन बडे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने काळेला अटक केली. पोलिसांनी त्याला पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील कारवाई पाथर्डी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button