अहमदनगर

हद्दच झाली! शेतकऱ्याचा एक लाखाचा कापूस चोरला

अहमदनगर- शेतातील खोलीत वेचून ठेवलेल्या कापसावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. नेवासा खुर्द येथील शेतातील खोलीत वेचून ठेवलेला सुमारे एक लाख रुपये किंमतीचा 13 क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

 

याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गफूर अमिर बागवान (वय 85) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझ्या नेवासा खुर्द शिवारातील असलेल्या साडेचार एकर शेतातील 1 लाख 4 हजार रुपये किमतीचा 13 क्विंटल कापूस मजुरांकडून वेचणी करुन शेतातील खोलीत ठेवला होता.

 

खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 8 नोव्हेंबर रोजी रात्री हा कापूस चोरून नेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार श्री. गिते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button