अहमदनगर

थेट इस्त्रायल देशाच्या शेतीत गुंतवणूकीचे आमिष; तरूणीला घातला ऑनलाइन गंडा

अहमदनगर- सायबर गुन्हेगार नवनवीन पध्दतीने फसवणूक करत आहेत. आता फसवणूकीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. तरूणीसोबत झालेल्या ओळखीचा फायदा घेत तरूणाने तिला तेथे इस्त्रायल देशात शेती करणार्‍या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचं आमिष दाखविले. तरूणाच्या या अमिषाला तरूणी बळी पडली आणि तीने त्याला ऑनलाईन 41 हजार 500 रूपये दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरात राहणार्‍या तरूणीसोबत ही फसवणूक झाली आहे.

 

पोलिसांनी लखीराम नंदलाल शिवणकर ऊर्फ लुक शिवणकर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्याविरूध्द भादंवि गुन्हा दाखल केला आहे. विवाह स्थळासंदर्भातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये फिर्यादी यांनी त्यांचा बायोडाटा टाकला होता. या बायोडाटावरील नंबरवर लखीरामने संपर्क केला. फिर्यादी व लखीराम यांच्यात मैत्री झाली. लखीरामने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन केला.

 

लखीरामने फिर्यादीला इस्त्रायल देशात शेती करणार्‍या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला फिर्यादी बळी पडून त्यांनी वेळोवेळी एकुण 41 हजार 500 रूपये लखीरामच्या खात्यात पाठविले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button