मराठा समाज एकत्र येऊन शासनाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही – मनोज जरांगे पाटील
असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवार (दि.८) रोजी राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे आयोजित केलेल्या सभेत शासनाला दिला आहे. जरांगे पाटलांचे राहुरीत आगमन होताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.

Maharashtra News : अंत पाहू नका नका. दिलेला शब्द पाळा; अन्यथा मराठा समाज एकत्र येऊन शासनाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही,
असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवार (दि.८) रोजी राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे आयोजित केलेल्या सभेत शासनाला दिला आहे. जरांगे पाटलांचे राहुरीत आगमन होताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील राज्याच्या विविध भागांत भेटी देऊन मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत. जरांगे पाटील राहुरीत आल्यानंतर सकल मराठा बांधवांच्या वतीने ढोल- ताशाच्या गजरात व डीजेच्या निनादात व जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मी मागे हटणारा किंवा मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही.
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे असून, कोणीही जाळपोळीसारखे कृत्य करू नका.
एकाही मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नये. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत.
आपण सावध राहायलाच हवे १४ ऑक्टोबरला अंतरवालीत मराठ्यांची महासभा होत असून, यासाठी सर्वांनी अंतरवाली सराटीत या.
निष्पाप लोकांवर प्राणघातक हल्ला राज्य सरकारच्या पोलिसांनी का केला, याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. हा केवळ आंदोलकांवरील हल्ला नाही,
तर तो मराठा समाजावरील हल्ला असल्याचेही ते म्हणाले. मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राहुल पेरणे, धनंजय साळुंके यांची यावेळी भाषणे झाली. राजूभाऊ शेटे यांनी आभार मानले.