अहमदनगर

माहेरून आठ लाख आणले नाही म्हणून विवाहितेला घराबाहेर काढले

अहमदनगर- घर घेण्यासाठी माहेरून आठ लाख रूपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी विवाहितेचा पती एजाज खलील खान, सासू मुमताज खलील खान, सासरे खलील उमर खान, दिर अझर खलील खान, नणंद सायरा खलील खान (सर्व रा. न्यू.डी.पी.रोड, नाशिक) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

 

6 जानेवारी, 2016 मध्ये फिर्यादी यांचा विवाह एजाज खलील खान सोबत झाला होता. सासरच्या लोकांनी फिर्यादीला पाच महिने व्यवस्थित नांदविले. त्यानंतर ते फिर्यादीला म्हणू लागले,‘तुझ्या घरच्यांनी लग्नात काही एक वस्तू दिल्या नाहीत, घर घेण्यासाठी तुझ्या माहेरकडील लोकांकडून आठ लाख रूपये घेवून ये’. फिर्यादी माहेरून पैसे आणत नसल्यामुळे सासू, सासरे, दिर, नणंद यांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

 

तसेच पती तिला म्हणाला,‘घर घेण्यासाठी पैसे घेऊन आली तरच मी तुला नांदवेल’. ऑगस्ट 2021 मध्ये सासू व सासरे हे फिर्यादीच्या पतीला म्हणाले,‘ही अजूनही घर घेण्यासाठी पैसे घेऊन आली नाही, तु कशाला हिला नांदवितो’, असे म्हटल्याने पती, दिर व नणंद यांनी फिर्यादीला मारहाण करून घराच्या बाहेर हाकलून दिले.

 

दरम्यान फिर्यादी नगर येथे आई-वडिलाकडे येऊन राहत आहे. त्यांनी सुरूवातीला भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. तेथे समुपदेश होऊन देखील फिर्यादी यांच्या सासरच्या लोकांना कहीच फरक न पडल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button