अहमदनगर

माहेरून दहा लाख आणले नाही म्हणून विवाहितेला काढले घराबाहेर

अहमदनगर- पुणे येथे घर घेण्यासाठी माहेरून 10 लाख रूपये न आणल्याने विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पती शाम राजेंद्र भोसले, सासरा राजेंद्र किसनराव भोसले, सासु विजया राजेंद्र भोसले, दिर राहुल राजेंद्र भोसले, जाव पुजा उर्फ स्नेहल राहुल भोसले (सर्व रा. शाहुनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

1 डिसेंबर, 2019 रोजी फिर्यादीचे लग्न शाम राजेंद्र भोसले याच्यासोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पती, सासु, सासरे, दिर, जाव, यांनी फिर्यादीला पुणे येथे नवीन घर घेण्यासाठी माहेरून 10 लाख रूपये घेवुन ये, असे म्हणुन होते. फिर्यादी यांनी पैसे न आणल्याने त्यांना सासरचे सर्व लोक शाररिक व मानसिक त्रास देवू लागले. फिर्यादी या पती सोबत डांगेचौक, थेरगाव (जि. पुणे) येथे भाडोत्री घरात राहत असताना त्यांना पती त्रास देत असे. पुण्यात नवीन घर घेण्याकरिता आईवडीलांकडुन 10 लाख रूपये घेवुन येण्याकरिता नेहमी शिवीगाळ करून मारहाण करत असे.

 

मार्च 2022 रोजी पती शाम याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन राहत्या घरातुन हाकलुन दिले. त्यानंतर फिर्यादी माहेरी राहत होत्या. त्यांनी 3 सप्टेंबर, 2022 रोजी भरोसा सेल येथे सासरच्या लोकांच्या विरूध्द तक्रार दिली. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलने दिलेल्या पत्रानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button