अहमदनगर

Ahmednagar News :अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; वाढदिवसाच्या दिवशीच साधला मुहूर्त

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच एका युवकाबरोबर पलायन केल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात घडली. ऑनलाईन क्लाससाठी घेतलेल्या मोबाईलचा वापर करून त्या मुलीने युवकासोबत मैत्री केली होती.

तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच दोघे पळून गेले आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी सोमवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्या युवकाविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या कुटूंबातील अल्पवयीन मुलगी 11 वीमध्ये शिक्षण घेते. तिच्या ऑनलाईन क्लाससाठी तिच्या घरच्यांनी तीला मोबाईल दिला होता.

त्या मोबाईचा वापर करून तिने एका युवकासोबत मैत्री केली. ते दोघे एकमेकांना भेटत होते. 9 एप्रिल रोजी त्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ती युवकाबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री नऊ वाजता घरच्यांना सांगून घराबाहेर पडली.

रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला परंतू, ती मिळून आली नाही. शेवटी तिच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुलीचा युवक मित्राविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button