अहमदनगर

Ahmednagar News | राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला पळविले

सावेडी उपनगरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शनिवारी रात्री फिर्यादी कुटूंबासह घरात झोपलेले होते. रविवारी सकाळी ते उठले त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरात नव्हती.

त्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत मुलीचा शोध सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button