अहमदनगर

अज्ञाताने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

केडगाव परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान फिर्यादी दैनंदिन कामकाजासाठी गेले होते. त्या दरम्यान फिर्यादीच्या मोठ्या मुलीने घरातून बिस्कीट आणण्यासाठी पैसे घेऊन अल्पवयीन मुलगी गेली असून ती घरी आली नसल्याची माहिती त्यांना फोनद्वारे दिली.

त्यानंतर फिर्यादीने घरी जात आजूबाजूला मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अज्ञात इसमाने आमिष दाखवून व फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button