अहमदनगर

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले आणि…

नवनागापूरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची घटना गुरूवार, 5 मे रोजी सकाळी सव्वा आठ ते सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या मुलीला गुरूवारी सकाळी नवनागापूरातील एका कॉलनीमधून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. घरातील व्यक्तीने तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतू ती मिळून आली नाही.

यानंतर शुक्रवारी पहाटे या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button