अकोलेअहमदनगरकर्जतकोपरगावजामखेडताज्या बातम्यानेवासापाथर्डीपारनेरराहाताराहुरीशेवगावश्रीगोंदाश्रीरामपूरसंगमनेर

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! देव दर्शनासाठी जिल्हाभरात ड्रेसकोड ! असे कपडे नाही चालणार…

नागपूर, अमरावती येथील काही मंदिरात ड्रेस कोड लागू‎ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता नगर शहरातील 15 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू‎ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण आता देव दर्शनासाठी जिल्हाभरात ड्रेसकोड बंधनकारक करण्यात येणार आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील सोळा मंदिरात ड्रेसकोड बाबतची नियमावली जाहीर करण्यात आली असून उद्यापासून हे नियमन लागू होणार आहेत.

अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहरातील 15 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू होत असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील धनवट यांनी दिली.

ड्रेस कोडबाबत नियमावली :- अहमदनगर शहरातमहाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने शहरातील छोट्या-मोठ्या सोळा मंदिरात या ड्रेस कोडबाबत नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे.

दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड लागू :- या नियमावलीचे उद्यापासून सक्तीचे पालन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. त्यानुसार दर्शनासाठी आता नियमावली जारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम :- अद्याप मंदिर प्रशासनाकडून ठोस नियम देण्यात आलेले नाहीत. कोणत्या कपड्यांवर बंदी? दर्शनाचे नियम काय असणार? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मात्र उद्यापासून हा नियम होणार असल्याने मंदिर प्रशासनाकडून उद्याच यावर निश्चित नियमावली जाहीर केली आहे.

ड्रेसकोड ठेवण्याबाबत मोठा वाद :- गेल्या काही दिवसांपासून मंदिरात ड्रेसकोड ठेवण्याबाबत मोठा वाद सुरु आहे. नागपूर, पुणे शहरातील काही मंदिरांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तर सप्तशृंगी देवी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते.

पालन करावे लागणार  :- हा निर्णय अद्याप झालेला नाही. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील 16 मंदिरांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येताना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.

राजकीय वातावरण तापलं :- राज्यातील विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोडबाबत सक्ती केली जात असताना या सक्तीबाबत राजकीय वातावरण देखील तापलं आहे. अनेक नेत्यांनी ड्रेसकोड संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली असल्याने अनेकांनी विरोध तर काहींनी समर्थन दर्शविले आहे. काही ठिकाणी ड्रेसकोडवरून मोठे राजकारणही पेटले असून विविध मंदिरांनी ड्रेसकोड सक्तीही केली आहे.

या मंदिरात असेल सक्ती :- अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर बुरानगर, श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि मारुती मंदिर झेंडीगेट, तुळजाभवानी माता मंदिर सबजेल चौक, श्री गणेश राधा कृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवन नगर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी नगर या मंदिरात उद्या पासून आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरामध्ये दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू होणार आहे.

का घेतला हा निर्णय ? :- मंदिराची संस्कृती पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्टचे अभय आगरकर यांनी सांगितलं. तसेच मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं असं नाही तर ते मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असं तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख अभिषेक भगत यांनी सांगितलं.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button