लेटेस्ट

‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जमावाला कोट्यवधींचा गल्ला

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवतो आहे.

पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला.

पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली.

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४७. ८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी चित्रपटानं सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे ६० कोटी रुपये एवढं झालं आहे.

चित्रपटाच्या कमाईमध्ये होणारी वाढ पाहता हा चित्रपटच लवकरच १०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल अशी आशा आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button