अहमदनगरलेटेस्ट

हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा हादरला ! चक्क सासर्‍याचा सूनेनेचकेलाय खून …. कारण वाचूनही बसेल धक्का

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आपल्या सासर्‍याचा सूनेनेच खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात मंगळवारी सकाळी घडली.

अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

त्यांची सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी बाबासाहेब चंदु बनकर (वय 42 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

अर्जुन हजारे हा सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले.

भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुर्‍हाडीने मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला आहे.आरोपी ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button