अहमदनगर

‘त्या’ विद्यार्थ्याच्या खूनाचे रहस्य उलगडले; नाजूक कारणांमधून…

अहमदनगर- संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या संकेत सुरेश नवले (रा. अकोले) या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाचा तपास करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. त्याचा खून कोणत्या कारणातून झाला याचं रहस्य उलगडले आहे. नाजूक कारणांमधून झालेल्या आर्थिक व्यवहारावरून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

 

संकेत नवले याचा खून करून त्याचा मृतदेह संगमनेर शहरातील पुनर्वसन कॉलनी परिसरातील नाटकी नाल्यात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नाजूक कारणातून झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीतून दोघांनी त्याचा खून करुन मृतदेह नाटकी नाल्याजवळ आणून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात हाती काहीच नसतांनाही संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गेले दोन महिने मोठे परिश्रम घेत खुनाचा हा प्रकार उघड केला. पोलिसांनी आरोपी न्यायालयात हजर केले असता एकाला पाच तर दुसर्‍या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

 

गेल्यावर्षी 8 डिसेंबर रोजी संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह संगमनेरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या बाजूला आढळून आला होता.शवविच्छेदनातून सदरील विद्यार्थ्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र या घटनेनंतर मारेकर्‍यांनी मयत संकेतचा मोबाईलही नेल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता, घटनेच्या दिवशी (8 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मयत संकेत सुरेश नवले हा विद्यार्थी नाटकीनाल्याच्या परिसरात स्वतः गेला होता.

 

 

तेथे त्याचा शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30) या दोघांशी संवाद झाला, त्यातूनच नाजुक संबंधातुनच जीवघेणा ठरला. या नाजुक संबंधातुनच त्यांच्यात शाब्दीक वाद झाले. या वादातून संतप्त झालेल्या त्या दोघांनी त्याच्या डोक्यात टणक वस्तु मारुन त्याला ठार केले, नंतर मोटारसायकलवरुन काही अंतरावर नेवून त्याचा मृतदेह नाटकीनाल्याच्या बाजूला फेकून दिला. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, अमित महाजन, पो. कॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर विभागाचे पो. ना. फुरकान शेख यांनी हा गुन्हा उघड केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button