अहमदनगर
अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित खुनाचे गूढ उकलेले, या कारणावरून…

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवरील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आले.
चोरीच्या उद्देशानेच दोघांचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आपेगाव शिवारात घराच्या छतावर दत्तात्रय गंगाधर भुजाडे अंदाजे (वय ७५) व पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) यांचे मृतदेह आढळून आले होते.
दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांचा खून कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने याची उकल केली.
या प्रकरणी अजय छंदू काळे (वय १९), अमित कागद चव्हाण(वय २०) व जंतेश छंदू काळे(वय २२) या तिघांना अटक केली आहे. चोरीसाठी त्यांना खून केल्याचे आढळून आले.