शेजारी कुठे गेल्याचे उत्तर दिले नाही; युवकास कुर्हाडीने…

केडगाव उपनगरातील दुधसागर सोसायटीमध्ये राहणार्या एका युवकाला कुर्हाड, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दुपारी ही घटना घडली.
मारहाणीत नागेश धर्मराज सानप (वय 23 रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) हा युवक जखमी झाला आहे. या प्रकरणी त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजारी राहणारे कुठे गेले याची माहिती न दिल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीतून समोर आले आहे. सोनू विश्वकर्मा (रा. रेल्वे स्टेशन, अहमदनगर) व त्याचे दोन अनोळखी मित्र यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. नागेश सानप हे दुधसागर सोसायटी येथील घरी असताना सोनू त्याच्या दोन मित्रांना घेऊन तेथे आला व नागेश यांना म्हणाला,‘कल्पना गायकवाड कुठे आहे’,
तेव्हा नागेश त्यांना म्हणाले,‘ती कुठे गेली आहे हे मला माहिती नाही’, असे म्हणताच सोनू व त्याच्या दोन साथीदारांनी नागेश यांना शिवीगाळ करत कुर्हाड व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
जखमी नागेशवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.