Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : धार्मिक स्थळासाठी आणलेला निधी थांबवण्याचे काम विरोधकांनी केले

Ahmednagar News : धार्मिक स्थळासाठी आणलेला निधी थांबवण्याचे काम विरोधकांनी केले

Ahmednagar News : जामखेड संतश्री गितेबाबा आणि संतश्री सीतारामबाबा गडावरील विकासकामांसह मतदारसंघातील इतरही धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळांच्या विकासासाठी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला.

परंतु मतदारसंघातीलच माझ्या विरोधकांच्या दबावामुळे या निधीला स्थगिती देण्यात आली होती. ती न्यायालयात जाऊन उठवावी लागली. स्थगिती नसती,

तर आतापर्यंत यातील अनेक कामे पूर्णत्वास गेली असती. ही सर्व कामे करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

संतश्री भगवानबाबा यांचे गुरू संत गितेबाबा व संत सीताराम बाबा यांच्या खर्डा (ता. जामखेड) येथील गडावर आमदार पवार यांनी मंजूर करून आणलेल्या ९ कोटींच्या निधीतून गुरुवारी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री आणि सीताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार पवार पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रकाश महाराज जंजिरे, संत मिराबाई संस्थानच्या राधाताई सानप महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप ढाकणे,

भूमचे माजी आमदार राहुल मोटे, कुंतीताई रोहित पवार, हरिभाऊ महाराज गिते, आसाराम महाराज साबळे आदी उपस्थित होते.

खर्डा येथील संत गितेबाबा हे संत भगवानबाबा यांचे गुरू असून याच गडावर संत भगवानबाबा यांची पालखी पंढरपूरकडे जाताना विसाव्यासाठी थांबत असते.

खर्चाचा शिवपट्टण किल्ला व किल्ल्यासमोर असलेला जगातील सर्वांत उंच भगवा स्वराज्य ध्वज पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. दोन्ही गडांवर भाविकांची दर्शनासाठी नेहमी गर्दी असते.

आमदार पवार यांनी गडाच्या विकासकामांसाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करून आणला. यामध्ये संत गितेबाबा गडावर सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालय आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे,

तर संत सीतारामबाबा गडावर सभामंडप व महंत निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या कामांचा भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि संत सीताराम बाबा गडाचे मठाधिपती महालिंग महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश महाराज जंजिरे यांचे हरिकिर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला.

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी संत गितेबाबा आणि संत सीतारामबाबा गडाला उभारी देण्याची कामे आज सुरू आहेत. ही कामे यापूर्वीच व्हायला हवी होती, अशी माझी इच्छा होती, परंतु विविध कारणांनी ते झाले नाही. यावरून हे काम केवळ आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातूनच व्हायचे होते, असेच म्हणावे लागेल. सूत्रसंचालन कैलास हजारे, प्रास्ताविक तुळशीदास गोपाळघरे यांनी केले.

चुकीच्या महाराजांच्या नादी लागू नका : नामदेव शास्त्री

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडावर जातीवादाला थारा नाही. परंतु काहींनी जातीवादाचे स्वरूप दिले. भगवान गडाच्या माध्यमातून २०० महंत तयार होत आहेत.

त्यातील एक महंत गितेबाबा गडासाठी दिला जाईल. जे महाराज परंपरेने आले, ते फसवणूक करीत नाहीत. त्यामुळे चुकीच्या महाराजांच्या नादी लागू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments