‘या’ पोलीस ठाण्यात धुळखात पडलेली वाहने मुळ मालकांना मिळाली

नगर तालुका ठाणे आवारात विविध गुन्ह्यातील शेकडो वाहने पोलिसांनी जप्त केलेली होती.
मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने सदर वाहन पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे धुळखात पडून होते. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परीसर बकाल व विचित्र दिसून येतो.
ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी वर्षानुवर्षे धुळखात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने यांच्या मुळ मालकाचा शोध घेऊन ती वाहने त्यांना परत देण्यात आली आहे.
मावळ (जि. पुणे) तालुक्यातील परंदवाडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी दोन दिवसांत 105 वाहने मुळ मालकांना परत दिली आहे.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला वाहनांचे चेसी व इंजीन नंबरवरून दोन दिवसांत एकून 105 वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेण्यात आला.
निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार जयदत्त बांगर, होमगार्ड शुभम म्हस्के व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, गोरख नवसुपे, संजय काळे यांनी यासाठी मेहनत घेतली.