Home अहमदनगर पक्षकारानेच पाच लाखांसाठी वकील दाम्पत्याचा केला खून अन मृतदेह…

पक्षकारानेच पाच लाखांसाठी वकील दाम्पत्याचा केला खून अन मृतदेह…

0
62

Ahmednagar News : पक्षकारानेच पाच लाखांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सराईत आरोपी व त्याचे ३ साथीदार २४ तासांच्या आत जेरबंद केले. पक्षकारानेच वकील पतीपत्नीचा खून केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम जयवंत आढाव व मनिषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी कोर्टामध्ये गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

याबाबत गुनहा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी जेरबंद केले आहेत. किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग व त्याचे साथीदार भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे , शुभम संजीत महाडिक , हर्षल दत्तात्रय ढोकणे , बबन सुनिल मोरे अशी त्यांची नावे आहेत.

आढाव वकील दाम्पत्यास २५ जानेवारी रोजी दुपारी कट करुन कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वत:च्या गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्याच घरामध्ये दोघांचे हात पाय बांधून ठेवून ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली, परंतु दोघांनीही त्यांना पैसे देण्यास नकार दिला.

त्यामुळे त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांना आढाव यांच्या गाडीमध्ये बसवुन मानोरी गावाच्या बाहेर घेऊन जाऊन रात्री दोघांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरुन खून केला.

त्यानंतर त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले व त्यानंतर आढाव यांची गाडी राहुरी कोर्टाच्या परिसरामध्ये आणून लावली.आरोपींकडून ही धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांनी उंबरेच्या स्मशानभूमीलगतच्या विहिरीतून आढाव दाम्पत्याचे मृतदेह शोधून काढले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here