पोलिसांनी केले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

Ahmednagar News : नगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली आहे. नेप्ती गावचे शिवारात असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.६ )दुपारी छापेमारी करत ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचा नाश केला आहे.
नेप्ती शिवारात अनेक हातभट्टया आहेत. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यावर काही दिवसातच पुन्हा हातभट्टया सुरु होतात, त्यामुळे नगर तालुका पोलिसांचा या भागाकडे कायम वॉच असतो.
या भागात तीन ठिकाणी पुन्हा हातभट्ट॒या सुरु झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने छापेमारी करत या कारवाई दरम्यान तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून,
कारवाईमध्ये लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ९३ हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला व सदर रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व डूम जागीच नाश करण्यात आले. या प्रकरणी महेश अनिल पवार,
विशाल मनोहर पवार, दिलीप नाथू पवार (सर्व रा.नेप्ती, ता.नगर) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शिशिर कुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग,
पोलीस अंमलदार विक्रांत भालसिंग, कमलेश पाथरुट, जयदत्त बांगर, चालक विकास शिंदे, महिला पोलीस नाईक फुंदे यांच्या पथकाने केली.