अहमदनगर

वीज कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या अभियंत्यासह पथकाला धक्काबुक्की

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून थकीत वीजबिल वसुली मोहिम सुरू आहे. मार्च एण्ड असल्याने ही मोहिम अधिक गतिमान करण्यात आली आहे.

वीजबिल थकल्यास ते भरले नाही तर कनेक्शन कट केले जात आहे. असेच एक वीजबिल थकल्याने कनेक्शन कट केले. याचा राग मनात धरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्यासह पथकाला शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली.

भिंगारमधील आलमगीर भागात उर्दु शाळेजवळ ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहानवाज इम्तीयाज रंगरेज (रा. आलमगीर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सहायक अभियंता श्रीनिवास वसंतराव आवढे (वय 33 रा. पाईपलाइन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

सहायक अभियंता आवढे हे त्यांच्या पथकासह आलमगीर येथील उर्दु शाळेजवळ राहत असलेले शहानवाज रंगरेज यांच्या घरी गेले. वीजबिल थकल्यामुळे आवढे यांच्या पथकाने रंगरेज यांचे कनेक्शन कट केले.

याचा राग रंगरेज यांना आल्याने त्यांनी आवढे यांच्यासह पथकाला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. आवढे व पथक करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button