अहमदनगर

लुटण्याचा प्रयत्न फसला अन् आरोपी गजाआड झाला

कारमधून प्रवास करणार्‍या दोघांना आडवून लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. विकास सर्जेराव रणसिंग (रा. वडगाव तांदळी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कामगिरी केली.

रविवारी दुपारी सचिन सुरेश शिंदे (वय 32 रा. अरणगाव ता. नगर) व त्यांचे मित्र त्यांच्या कारमधून वडगाव तांदळी ते वाळकी रोडने अरणगावकडे जात असताना दोघांनी त्यांना अडवून त्यांच्या खिशातील पाकिटामधील पैसे बळजबरीने काढून घेण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी त्यांच्याकडील आधार कार्ड, मोबाईल व दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेले होते.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चव्हाण, भास्कर लबडे, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने आरोपी रणसिंग याचा शोध घेऊन त्याला अटक केली. घोंगडे पसार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button